मुंबई : काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा ओघ सतत वाढत असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप वामनराव गड्डमवार तसेच जिल्हा बँकेचे संचालक, माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेमध्ये प्रवेश केला.
संदीप यांचे वडील वामनराव गड्डमवार हे काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी राज्य मंत्री तसेच चंद्रपुर-गडचिरोली जिल्हा परीषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस अधिक मजबूत होईल.काँग्रेसचा विचार हाच देशहिताचा विचार आहे. राज्यात व देशात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो लोकांच्या हितासाठी सतत संघर्ष करत आला आहे. संविधानाला कुठेही बाधा येऊ न देता काँग्रेस पक्ष कार्य करत आला आहे. काँग्रेस हा सर्वसामान्यांना ताकद देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
गांधी भवन येथे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपुरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन,सरचिटणीस व मा. आ. मोहन जोशी, माजी आमदार मधू चव्हाण, प्रदेश सचिव संतोष केणे, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप वामनराव गड्डमवार व रविंद्र शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे मी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस अधिक मजबूत होईल. pic.twitter.com/hlcGteIv1F
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 24, 2020
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की,विदर्भातील जनतेने पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडूण देऊन काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवलेला आहे. ते चित्र पाहता विदर्भातील जनता अजूनही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. विदर्भातील संदीप वामनराव गड्डमवार व रविंद्र शिंदे यांचे थोरात यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा धनंजय मुंडेंना डच्चू; राजेश टोपेंकडे नवी जबाबदारी
- रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका, तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त
- कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याच्या निर्णयावरून श्वेता महालेंची राज्य सरकार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

