Share

महसूल मंत्री थोरात वडेट्टीवारांना म्हणाले, ‘मोठी संधी मिळेल, वाट पाहा!’

Published On: 

मुंबई : आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांचा हा आरोप काँग्रेससह महाविकास आघाडीला घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी,’ थोरात यांनी दिला.

थोरात म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना काँग्रेसने संधी दिली. वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर मोठी संधी पुढच्या काळात मिळेल.काँग्रेस बिलकुल जातीयवादी किंवा धर्मवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वडेट्टीवार यांना वेगळं काहीतरी म्हणायचं असेल, आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. वडेट्टीवारांचं वय पाहिलं तर खूप मोठी संधी पुढच्या काळात मिळणार आहे. त्याकरता त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल’.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
‘महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. ‘झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये’. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली,’ असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!