🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशीच बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. शिवसेनेचे डझनभर नेत्यांनी शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका शिसेनेला तसेच महाविकास आघाडी सरकारला बसला आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे.
“एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव “शिवसेना” ऐवजी “शिल्लक सेना” करून घ्यावं.”, असा खोचक सल्ला निलेश राणे यी ट्वीट करत दिला आहे.
एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव "शिवसेना" ऐवजी
"शिल्लक सेना" करून घ्यावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 27, 2022
दरम्यान या सर्व बंडामागील खुलासा एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत केला आहे. “मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nikhil Wagle: एकनाथ शिंदेंची भाषा ‘भाजप’ची, फडणवीस किती काळ लपणार तुम्ही?; निखील वागळे यांचा टोला
- Eknath Shinde : “…यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल”, एकनाथ शिंदेंचा ट्वीट करत बंडखोरीमागील खुलासा
- Nilesh Rane : “…त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे”, ‘त्या’ वक्तव्यावरून निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना सुनावले
- IRE vs IND 1st T20 : हार्दिकच्या टीम इंडियाचा विजयारंभ; मालिकेत घेतली आघाडी!
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला धक्का; ठाकरे सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
