Share

Nikhil Wagle: एकनाथ शिंदेंची भाषा ‘भाजप’ची, फडणवीस किती काळ लपणार तुम्ही?; निखील वागळे यांचा टोला

Published On: 

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशीच बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. शिवसेनेचे डझनभर नेत्यांनी शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही संकट कोसळले आहे. या सर्व बंडामागील खुलासा एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत केला आहे. मात्र या ट्वीटनंतर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.

“एकनाथ शिंदे आता थेट भाजपची भाषा बोलायला लागले आहेत. त्यांची निवेदनं, सोशल मिडिया भाजपवाले लिहित असावेत असा संशय येतो. फडणवीस, किती काळ लपणार तुम्ही?”, असा टोला लगावत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट-

“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!