Share

Nilam Gorhe | “आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही”

Published On: 

मुंबई :  आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी भाजप पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली होती. ही बैठक आगमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात होती. त्यादरम्यान, ज्यांनी धोका दिला त्यांना माफी नाही, असं शहा यांनी सांगितलं आहे. अशातच शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य-

आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही. जनतेच्या दरबारात जे काय होईल ते होईल. त्याच्या आधीच कोणी दर्पोक्ती कोणी करू नये, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. नीलम  गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे नीलम गोऱ्हे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आले होते. यावेळी गोऱ्हे यांनी दानवेंचे कौतुक करत, भाजप पक्षावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, अंबादास दानवे झंझावातासारखे काम करत आहेत. राजधर्म पाळा, असे नरेंद्र मोदींना अटलजींनी सांगितले होते. मोदींना जबाबदारी तशीच ठेवा, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र एवढ्या लवकर तुम्ही इतिहास विसरलात.

काय म्हणाले अंबादास दानवे-

दरम्यान, अंबादास दानवे यांनीही भाजपवर हल्ला केला आहे. दानवे म्हणाले की,मागच्या महिन्यात उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला केला, असा आरोप करण्यात आला होता. काही पुरावे नसताना रात्री गुन्हे दाखल केले होते. मात्र अशा दडपशाहीला आम्ही घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!