Share

Amit Shaha | अमित शहांच्या मुंबई दौराचं ‘असं’ आहे नियोजन, ट्विट द्वारे दिली माहिती

Published On: 

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शहांनी चर्चा केली. सह्याद्री अतिथी गृहावर या तिघांची भेट झाली असून विनोद तावडे, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, अशी भाजपच्या बड्या नेत्यांची फौज या ठिकाणी पाहायला मिळाली आहे.

लालबागच्या राजाच्या मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र शहांच्या नियोजित कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अमित शहा यांनी मराठीमध्ये एक ट्विट करत मुंबई दौराची माहिती दिली आहे.

गणेश उत्सव दरम्यान मुंबईमध्ये उपस्थित असणं, हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर मांजरी पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईल, शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल, अशी माहिती शहांनीत्यांच्या ट्विटमधून दिली आहे.

अमित शहांच्या स्वागतासाठी भाजपच नाही तर शिंदे गटाने देखील जोरदार तयारी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचं शिवसेनेतर्फे मुंबईमध्ये स्वागत, असं लिहिलेले बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र विशेष म्हणजे मातोश्री समोरही अशी पोस्टरबाजी करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना नडिवचण्याचं काम शिंदे गटाने केलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!