Share

थरारक! ‘त्या’ मुलीची अखेर फिल्मी स्टाईलने सुटका

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : अपहरण झालेल्या १४ वर्षांच्या मुलीची काही तासातच हिंगोलीतील बासंबा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपीच्या तावडीतून सुखरुप सुटका केली. यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले आहे.

बासंबा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिंचोली येथून मंगळवारी १४ वर्षीय मुलीचे शेजारी नातेवाईकांच्या घरी आलेल्या अनोळखी महिलेने अपहरण केले होते. त्याबाबत पोलिस ठाणे बासंबा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु आणि त्यांच्या पथकाने तत्काळ तपासाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली.

या दरम्यान, गुरुवारी पोलिसांना माहिती मिळाली की, अपहरण केलेल्या मुलीला घेऊन आरोपी महिला आणि तिचा सहकारी मारोती डांगे हे रेल्वेने नांदेडकडे येणार आहेत. यावेळी पोलिसांनी परभणी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला. येथे तब्बल सात पोलिस पथक मुलीसह अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. यावेळी औरंगाबाद येथून आलेल्या एका रेल्वेमधून शिताफीने पोलिसांनी पिडीत मुलीस, आरोपी महिला व तिचा सहकाऱ्याला ताब्यात घेतले. फिल्मी स्टाईलप्रमाणे तब्बल सात तास पाच रेल्वे तपासून पोलिसांनी मुलीची सुखरुपरित्या सुटका केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!