कोलकाता : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगलामध्ये एकूण आठ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकावरून हल्लाबोल केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषद घेत आयोगाला खडसावत विचारले आहे की, हे वेळापत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरुन तयार केलं गेलंय की अमित शहांच्या? त्यांच्या प्रचाराला सोयीस्कर ठरेल यासाठीच या तारखा बनवण्यात आल्या आहेत का? जेणेकरुन ते आसाम आणि तमिळनाडूच्या निवडणुका संपवून बंगालकडे आपला मोर्चा वळवू शकतील? हे भाजपला फायद्याचे ठरणार नाहीये. आम्ही त्यांना पराभूत करूत असे ममता म्हणाल्या.
Centre can't misuse their powers for a State election. If they do it, then, it will be a big blunder. then, they will have to face the music. We are common people, we will fight our battle. Request EC to stop misuse of money. BJP has sent money to all Dist through agencies: WB CM pic.twitter.com/suvjjuMnO2
— ANI (@ANI) February 26, 2021
केंद्रीय गृहमंत्र्यांनी संपूर्ण देशासाठी काम करायला हवं. ते निवडणुकांसाठी आपल्या सत्तेचा वापर करु शकत नाहीत. आम्ही पंतप्रधानांचं स्वागत करतो. मात्र, ते सत्तेचा दुरुपयोग करु शकत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, या निवडणूक कार्यक्रमांवर काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. केरळमध्ये १४० जागा, तामिळनाडूत २३४, पुडुचेरीच्या ३० जागा अशा एकूण ४०४ जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, आसाम १२६ आणि पश्चिम बंगाल २९४ अशा ४२० जागांसाठी सात ते आठ टप्प्यात का मतदान घेतले जाणार आहे? यामागे काही वेगळी योजना तर नाही ना असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरून पृथ्वीराज चव्हाण यांना संशय, म्हणाले..
- ‘पूजाची बदनामी थांबवा नाही अन्यथा आत्महत्या करेल’, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
- खाकीतील सौंदर्यवती! उपनिरीक्षक पल्लवी जाधवच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
- महत्त्वाचे! पूजा चव्हाण प्रकरणी पहिला खासगी खटला दाखल
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

