Share

सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलँडकडून पराभव

Published On: 

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची न्यूझीलँड विरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु आहे. ज्यात पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलँडने भारताला अवघ्या ३ विकेट्सने पराभूत केले आहे.

नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार मिताली राजने फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यात मितालीने ६६ धावांची नाबाद खेळी केली. तर रिचा घोषणेही ६५ धावा केल्या. तर न्यूझीलँडकडून डेवीनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. भारताने ५० ओव्हरमध्ये न्यूझीलँडला ६ बाद २७० धावांचे लक्ष दिले. २७०चा पाठलाग करताना न्यूझीलँडच्या फलंदाज अमेलिया केर हिने ११९ धावांची नाबाद शतकी खेळी केली. तसेच मॅडी ग्रीनने अर्धशतक केले. भारतीय गोलंदाजीत दीप्ती शर्माने शानदार कामगिरी करत ४ विकेट्स पटकावल्या. मात्र भारतीय संघ किवीसला जिंकण्यापासून रोखू शकला नाही. न्यूजीलँडने ४९व्या षटकात २७३ धावा करत विजय मिळवला.

भारतासाठी हा मालिकेतला दुसरा पराभव ठरला आहे. पाच सामन्यांची हि एक दिवसीय मालिका आहे. भारताला पुनरागमन करण्यासाठी अजून ३ सामने जिंकावे लागतील. न्यूझीलँड मालिकेतील कामगिरीच्या जोरावर भारतीय सांग वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दौरा महत्वाचा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!