मुंबई: वेस्ट इंडिजला एकदिवसीय मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर आज भारतीय संघ आगामी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी २० आंतरराष्ट्रीय सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे. मालिकेआधी उपकर्णधार असलेला के एल राहुल दुखापत ग्रस्त झाला. ज्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. मात्र याच संधीचे सोने करत भारतीय संघाने विकेटकिपर फलंदाज रिषभ पंतला नवीन उपकर्णधार घोषित केले आहे.
केएल राहुलला बहिणीच्या लग्नामुळे पहिला एकदिवसीय सामना खेळता आला नव्हता. तो संघात सामील झाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने भारतीय संघासाठी चौथ्या नंबरवर फलंदाजी केली. त्यानंतर के एलला दुखापत झाल्याचे समोर आले आणि तो शेवटच्या वनडे सोबतच टी २० मालिकेतूनही बाहेर पडला. टी २० मालिकेच्या सुरुवाती आधी बीसीसीआयने ऋषभ पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय टी २० संघाचा उपकर्णधार म्हणून नेमले.
हिटमॅन रोहित शर्माच्या कर्णधारपदात स्पायडरमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिषभ पंतला उपकर्णधार बनवणे भविष्याकडे वाटचाल असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. बऱ्याच काळापासून रिषभ पंतला टीम इंडियाचा संभाव्य कर्णधार म्हणून पहिल्या जात होते. आता औपचारिक रित्या रिषभ कर्णधारपदाच्या एक पाऊल जवळ पोहचला आहे.
महत्वाच्या बातम्या
- या सरकारचा विदर्भ विरोधी चेहरा हा उघड झाला- देवेंद्र फडणवीस
- IND vs WI: भारत विरुद्ध विंडीजचा पहिला टी २० सामना आज रंगणार
- ‘अलिबागमधले १९ बंगले…’; सोमय्यांच्या टीकेवर संजय राऊतांचा सवाल
- मेगा ऑक्शनमध्ये मोठी गडबड बोली मुंबईची पण खेळाडू दिल्लीला दिला
- किरीट सोमय्या म्हणाले; ‘मला जोड्यानं मारताय, मारा, पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

