Share

‘याला म्हणतात मावळा’; अमोल कोल्हे बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार

Published On: 

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज खरा ठरवला. अमोल कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळाला. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao Patil) यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना ११ फेब्रुवारीला खोचक टीका केली होती. प्रचारात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आढळरावांनी त्यांच्या गावातील घाटात येण्याचं आमंत्रण कोल्हे यांना दिलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते.

अमोल कोल्हेंच्या आश्वासनावरून आढळराव पाटलांनी त्यांना अनेकदा घाट दाखवला. पुढे देखील ते अनेकदा कोल्हेंना या मुद्यावरुन कोंडीत पकडू शकतात, हे लक्षात आल्यानं पहिल्या बारीत नाही तर नाही निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे आज तयार झाले. त्यामुळे ज्यांना शंका होती त्यांना उत्तर मिळालं, अशी प्रतिक्रिया देखील अमोल कोल्हेंनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!