मुंबई : अंडरवर्ल्ड डॉनचा भाऊ आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. इकबाल कासकरला ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात धाव घेतली आहे.
दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने इक्बाल कासकरला ताब्यात घेतले होते. मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात ईडीने ४-५ जणांची चौकशी केली आहे. आणखी काही जणांनाही समन्स बजावण्यात येणार आहेत. याशिवाय आज (बुधवार) सलीम फ्रूटवाला यांनाही ईडीने समन्स बजावले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम फ्रूटवाला पाकिस्तानात गेला होता. याबाबत तपास सुरू आहे. सलीम फ्रूटवाला यांचा हवाला व्यवसायाशी काय संबंध आहे?, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे ईडीने मंगळवारी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या घरीही छापा टाकला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीला छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

