🕒 1 min read
मुंबई: आयपीएलचे कोणतेही संघ असुदे मुंबई इंडियन्सच सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला नेहमी खरेदी करत असते. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्येही अर्जुनचे नाव आले. आणि सगळ्या संघाना माहिती होते कि अर्जुन मुंबईतच जाणार. यामुळे त्यांनी बोली लावली नाही. मात्र , सचिनचा जिना मित्र आशिष नेहराने मुंबई फ्रँचायझीसोबत त्यांच्या खास शैलीत मजा घेतली.
मेगा ऑक्शनमध्ये अर्जुनचे नाव येताच गुजरात संघाचा प्रशिक्षक असलेल्या नेहराजीने मुद्दाम अर्जुन तेंडुलकरसाठी बोली लावली. बेस प्राईस २० लाख असलेल्या अर्जुनसाठी मुंबईला अतिरिक्त १० लाख रुपये खर्च करावे लागले. गुजरातच्या संघाचा अर्जुनमध्ये विशेष रस नव्हता. किंवा अर्जुनने त्याच्या क्रिकेटमध्ये अशी काहीही मोठी खेळी केलेली नाही ज्यामुळे इतर संघ त्याच्यात रस घेतील. आकाश अंबानीची मजा घेण्यासाठी नेहराजींनी त्याच्यावर बोली लावली. आशिष नेहराच्या या कृतीनंतर आकाश अंबानी आणि जहीर खान हसताना दिसले.
Ashish Nehra was the highlight of the day at the #IPLAuction pic.twitter.com/L8UC0aevtd
— Nikita Chowdhary (@nikitac09) February 13, 2022
Nehra Ji allowed Arjun Tendulkar earn to earn 10 lac extra.
— Khem Raj Thakur (@Raj11_Speaks) February 13, 2022
अर्जुन तेंडुलकर पिता सचिन तेंडुलकरपेक्षा वेगळे क्रिकेट खेळतो.अर्जुन एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. गेल्या वर्षीही २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपयांना विकत घेतले होते. एका हंगामानंतर, त्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नाही. IPL 2022 च्या ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सनेच विकत घेतले. गुजरात टायटन्सने यंदा अर्जुनवर बोली लावली असली तरी अखेर मुंबईने त्याला विकत घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI: कर्णधार हिटमॅनसोबत आता स्पायडरमॅन उपकर्णधार
- “उद्धवजी तर दूरच, पण…”; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक टोला
- संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
- या सरकारचा विदर्भ विरोधी चेहरा हा उघड झाला- देवेंद्र फडणवीस
- IND vs WI: भारत विरुद्ध विंडीजचा पहिला टी २० सामना आज रंगणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
