Share

भाजपसोबत राहण्यासाठी ‘या’ अपक्ष आमदारावर शुक्लांचा दबाव होता; आव्हाडांचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई : मुंबई मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.

याच प्रकरणात फडणवीसांनी विविध पुरावे सादर केल्यानंतर आता, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवेळी शिरोळचे अपक्ष आमदार व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना भाजप सोबतच राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी धमकावल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत,’ असं आव्हाड म्हणाले आहेत.

सगळ्याच मंत्र्यांचे फोन टॅप झाल्याची शक्यता !

आव्हाड म्हणाले, ‘फोन टॅप करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव यांची परवानगी लागते. आम्ही सीताराम कुंटे यांना परवानगी दिली का विचारलं तर त्यांनी उत्तर नाही असं दिलं. फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे. रश्मी शुक्ला यांचं कृत्य लक्षात आल्यानंतर त्यांना बोलावून घेतलं. यावेळी त्यांनी कबुली दिली आणि माफी मागितली होती. यामुळे फोन टॅपिंग होत असल्याचं लक्षात आलं.’

तर, ‘सगळ्याच मंत्र्यांचे फोन टॅप झाले झाले असतील. यातून सरकारला बदनाम करण्याचा कट होता. मंत्रिमंडळात याची चर्चा झाली. अत्यंत संतप्त प्रतिक्रिया यावर मंत्र्यांनी दिल्या. याची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे. हे मोठं कटकारस्थान आहे,’ असं भाष्य जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!