🕒 1 min read
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला नुकतीच 2 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानंतर आता राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. यामध्ये काही जुन्या अनुभवी नेत्यांच्या सोबत काही तरुण नेत्यांची देखील वर्णी लागणार आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
मोदींच्या मंत्रिमंडळात सध्याच्या घडीला 8 ते 9 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या खात्यांचा अतिरिक्त प्रभार असल्यामुळे अनेक खात्यांचा कारभार धीम्या गतीने सुरु असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होणं हे गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात जवळपास 25 खासदार आणि मंत्र्यांची भेट घेतली आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे पंतप्रधान मोदी यांना इच्छा असूनही मंत्रिमंडळात वाढ करता आली नाही. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
मोदींच्या पहिल्या कार्यकाळाच्या कॅबिनेटमध्ये शिवसेना, अकाली दल, अपना दल, रिपाइं अशा काही घटक पक्षांचे नेते मंत्रिपदावर होते. यातील काही पक्षांनी आता साथ सोडल्याने त्यांच्या वाट्याच्या मंत्रीपदावर आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्रातून नारायण राणे, सुरेश प्रभू यांची वर्णी लागू शकेल अशी शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, दिनेश त्रिवेदी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, जमयांग सेरिंग नामग्याल यांच्यासह वरुण गांधींचाही समावेश होऊ शकतो अशी चर्चा आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीदेखील जेडीयू नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास संमती दर्शवली आहे. यामुळे जेडीयूला मंत्रिमंडळ विस्तारात योग्य प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. असा अंदाज राजकीय तज्ञांनी वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
- प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता आणखी काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता?
- मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही – अजित पवार
- शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीबाबत बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
