कोलकाता – पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीचा शंखनादही झाला असून प्रचारसभांना जोर आला आहे. या पाच राज्यात सर्वात लक्षवेधी मुकाबला प.बंगालमध्ये होणार आहे.
भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. कॉंग्रेसची या निवडणुकीत डाव्यांच्या सोबत आघाडी आहे तर एमआयएम देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे.यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच एमआयएम ,काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे.
बंगाल जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असून या प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम हे देखील अशाच पद्धतीने बरळले आहेत.
वीरभूम जिल्ह्यातील नानूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विधानचंद्र मांझी यांचा प्रचार करण्यासाठी शेख आलम हे आले होते. त्यावेळी त्यांनी हे अतिशय संतापजनक असे वक्तव्य केले आहे.
Y’day, TMC leader Sheikh Alam, giving a speech in Basa para, Nanoor, in Birbhum AC said, if 30% Muslims in India come together, then 4 Pakistan can be formed…
He obviously owes his allegiance to Mamata Banerjee… Does she endorse this position?
Do we want a Bengal like that? pic.twitter.com/YjAeSzhH5P
— Amit Malviya (@amitmalviya) March 25, 2021
शेख आलम म्हणाले की, जर भारतातील ३० टक्के मुसलमान एकजूट झाले तर भारतामध्ये चार नवे पाकिस्तान बनू शकतात. दरम्यान, शेख आलम यांच्या विधानावरून भाजपाने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युपीएच्या कॅप्टन बदलावर १६ वा गडी बोलतोय, त्याला काही अर्थ नाही’
- मोठी बातमी : सचिन वाझेंचा एनआयए कोठडीतील मुक्काम वाढला !
- ‘१२ आमदारांवर राज्यपालांना पीएचडी करायची आहे का ?’ संजय राऊतांचा सवाल
- अध्यक्षपदाबाबत बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, सेनेनं आधी यूपीएचा भाग व्हावं – सावंत
- आता केवळ १०० रूपयात बघा नाटक; प्रशांत दामले यांचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

