Share

‘युपीएच्या कॅप्टन बदलावर १६ वा गडी बोलतोय, त्याला काही अर्थ नाही’

Published On: 

मुंबई : वडाळा विधानसभा मतदार संघात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या आमदार चषकाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. क्रिकेटच्या मैदानात फटके लगावून झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजकीय फटकेबाजी देखील केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करण्याच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत वकिली करताना दिसून येत आहेत. राऊत यांच्या युपीएच्या अध्यक्षपदाबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याचे वृत्त होते. परंतु, युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही,असे सांगत पवरांकडे नेतृत्व देण्याच्या मागणीचा राऊत यांनी पुनरुच्चार केला आहे.

शिवसेना अद्यापही युपीएची सदस्य नाहीये, याच मुद्द्यावरून फडणवीसांनी राऊतांच्या मागणीवर हल्लाबोल केला आहे. ‘युपीएच्या कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

‘मला बॅटिंग करायला मजा येते आणि बॉलिंगही थेट स्टम्प्सवर करतो’

‘मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. मी बॉडीलाईन बोलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल ऑन द स्टम्प बोलिंग करतो. माझा शॉर्टपिचही बॉल नसतो. मात्र, माझ्या गोलंदाजीने समोरच्याला बॅटिंग करताना, अडचण येते,’ असं भाष्य तुफानी फलंदाजीनंतर फडणवीसांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!