Share

आता केवळ १०० रूपयात बघा नाटक; प्रशांत दामले यांचा निर्णय

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मागील वर्षीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नाट्यगृह पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु अजूनही नाट्यगृहला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.

नाटकाचे तिकीट महाग असल्याने सर्व सामान्य माणसाच्या खिशाला ते परवडणारे नसते. त्यामुळे सहकुटुंब नाटक पाहण्यास जायचे म्हंटले तर तिकिटाचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे सध्या नाटकगृहात गर्दी कमी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची ही अडचण लक्षात घेत अभिनेते प्रशांत दामले यांनी एक उपक्रम सुरु केला आहे. प्रशांत दामले यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा आता प्रेक्षकांना होणार आहे.

https://www.facebook.com/PrashantDamleFans/posts/294517575368366

सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु झाली असून, ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नाही. थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार असल्याचे प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन, असा शब्द नाट्यरसिकांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!