मुंबई : भाजपच्या एका शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टाळल्यामुळे आता यावर एकच चर्चा सुरु झाली आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल आणि भाजपवर टीका केली आहे. ‘राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भूमिका ही संशयास्पद असून राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे’. असे नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यावेळी राउत म्हणाले की , ‘राज्यपाल आजकाल खूपच व्यस्त आहेत, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हेही मला माहिती नाही. मात्र, गेल्या २ दिवसांपासून भाजपच्या लोकांचं राजभवनमध्ये येण-जाणं, खाणं-पिणं चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. त्या १२ नावांचं काय झालंय, यावर राजभवनमधून खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करत आहेत ते ठीक आहे, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
घटनात्मकदृष्ट्या आम्ही जी नावं पाठवली ती, आपल्या मांडीखाली दाबून एखादा गिनीज बुकमधील विक्रम करायचाय का राज्यपालांना हाही अभ्यासाचा विषय आहे. राज्य सरकारबद्दल राज्यपालांनी आजपर्यंत जी भूमिका घेतलीय, त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात राजभवनाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले?’
- शिवसेना सोडलेल्या नरेंद्र पाटलांचं ठरलं ! म्हणाले, ‘फडणवीस सांगतील तेव्हा…’
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये लागणार लॉकडाऊन?
- प्राजक्ता गायकवाडच्या क्युट कॉस्ट्यूम डिझायनरला पाहिलंत का?
- अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सारखा गॉगल घालून सेल्फीची आनंद महिंद्रा यांची पोस्ट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

