मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीतील शिवसेना – कॉंग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहेत. युपीएच्या अध्यक्षपदावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं, असं म्हटलं होतं. राऊतांच्या या विधानावर काँग्रेस नेते आता आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही राऊतांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. ‘शिवसेना यूपीएचा भाग नाही, अध्यक्षपदाबाबत बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, त्यांनी आधी यूपीएचा भाग व्हावं मग या मागण्या कराव्यात’ असा सल्ला सचिन सावंत यांनी संजय राऊत दिला आहे.
सचिन सावंत म्हणाले कि ‘आम्ही पहिल्यांदाच स्पष्ट केलं आहे कि, शिवसेना हा पक्ष यूपीएचा भाग नाही, त्यांना कोणतीही मागणी करायची असेल तर आगोदर UPA चा घटक दल बनावे त्यांनी, त्यानंतर तुमचा बोलण्याचा अधिकार राहतो. सातत्याने त्यांना काही ना काही लिहावं लागतंय त्यामुळे ते कदाचित काही ना काही मागण्या करत असतात. एकदा सांगितल्या नंतरही त्यांना पुन्हा पुन्हा सांगाव लागत.’ असा चिमटा त्यांनी राऊतांना घेतला आहे.एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
ते UPA चे जरी घटक दल नसले तरी, राज्यामध्ये सर्वजण एकत्र आहात अस प्रश्न विचारल्या नंतर सचिन सावंत म्हणाले कि. ‘आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत,आमच्यामध्ये वैचारिक विभिन्नता असताना देखील भाजपा चा विरोध करणे गरजेचे आहे आणि लोकशाही संवर्धन करणे गरजेच आहे त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. UPA हा राष्ट्रीय दल आहे NDA च्या विरोधामध्ये, UPA माध्यमातून आम्ही NDA चा सात्याताने विरोध करत आहोत. त्यामुळे मला अस वाटते कि या संदर्भात बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही.’ अस सचिन सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.
याआगोदर संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीबाबत मोठे वक्तव्य केलं होतं. ‘यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. किंबहुना ती सोनिया गांधी पण भूमिका असू शकते, सोनिया गांधींनी प्रदीर्घकाळ यूपीएचे नेतृत्व अत्यंत खंबीरपणे केले आहे. मात्र, सध्या पाहता सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसते. देशातल्या घडामोडी वेगळ्याप्रकराच्या सुरु आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे.आज UPA ही अत्यंत विकलांग अवस्थेत आहे.’ असं राऊत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- रणबीर-आलियाच्या संगीतमध्ये ‘या’ गाण्यावर डान्स करणार आई नीतू कपूर ; व्हिडिओ व्हायरल
- …आणि ‘या’ माकडांना वाटतं की, ते बंगालमध्ये जिंकतील ?
- अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या वडिलांचे निधन
- ‘मी पुन्हा येऊ का?’ ‘या’ कॉमेडीयने साधला फडणवीसांवर निशाणा
- ‘त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा’,भाजपा नेत्याची ममतांवर वादग्रस्त टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

