Share

मोठी बातमी : सचिन वाझेंचा एनआयए कोठडीतील मुक्काम वाढला !

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. मागील सुनावणीमध्ये एनआयए कोर्टाने वाझेंना २५ मार्च पर्यंतची कोठडी सुनावली होती.

वाझेंची कोठडी आज संपत असल्याने एनआयएने विशेष एनआयए न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. ‘वाझेंंचा गुन्हा हा देशपातळीवरील मोठा गुन्हा आहे. एखाद्या पोलिसाचा अश्या गुन्ह्यात सहभाग असणं ही शरमेची बाब आहे,’ असा युक्तिवाद करतानाच वाझेंची आणखी १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी एनआयए तर्फे एएसजी अनिल सिंह यांनी केली आहे.

सचिन वाझे हे तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. तसेच, हे गंभीर प्रकरण असून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे देखील न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालयाने, एनआयए आणि सचिन वाझेंच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर आता त्यांना ३ एप्रिल पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सचिन वाझेंनी सर्व आरोप फेटाळून लावत बळीचा बकरा बनवला जात असल्याचं विधान न्यायालयात केलं आहे. तर, दिवसेंदिवस वाझेंविरोधात अनेक सबळ पुरावे समोर येत असल्याने याप्रकरणाचा संपूर्ण छडा लावण्यात एनआयएला मदत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!