Share

चीनमधील ‘डॉग मीट फेस्टीव्हल’ची का होतेय जगभर चर्चा ?

Published On: 

नवी दिल्ली – चीनमधील खाण्यापिण्याच्या पदार्थांची नेहमीच चर्चा होत असते. साप,बेडूक,वाटवाघुळ,मांजर आदींपासून बनविण्यात येणारे पदार्थ मोठ्या चवीने चीनमध्ये खाल्ले जातात. यातच आता जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका फेस्टिव्हलची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

चीनच्या यूलिन प्रांतात १० दिवस चालणाऱ्या ‘डॉग मीट फेस्टीव्हल’ला सुरूवात झाली आहे. या दहा दिवसांत ५ हजारहून अधिक कुत्र्यांचा बळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या चाईना पॉलिसी एक्सपर्ट डॉ. पीटर ली यांनी म्हटलं की, करोना काळात अशा फेस्टीव्हलला मंजुरी देणे धोकादायक ठरू शकतं. या फेस्टीव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील कुत्र्याचं मांस खातील, त्यामुळे करोना संसर्ग वाढू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.

या फेस्टीव्हलमध्ये दुसऱ्या प्रांतातून कुत्रे आणण्यात येत आहेत. तसेच फेस्टीव्हलच्या नावावर हजारो कुत्र्यांना ठार करण्यात येत आहे. फेस्टीव्हलच्या आधीपासूनच मांस विक्रेत्यांनी कुत्र्यांना कापून बकऱ्यांप्रमाणे आपल्या दुकानांमध्ये लटकवलं आहे.दरम्यान, या फेस्टिव्हल नंतर कोरोना वाढीचा धोका लक्षात घेता या फेस्टिव्हलकडे सर्व देशांचे लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!