पुणे : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड करण्याची प्रक्रिया चांगलीच रखडली आहे.या निवडणुकीसाठी अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. खर तर विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर मागील वर्षी जूनमध्येची निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली होती.
देशात एकूण ७ राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे.कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो.
दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.
दरम्यान, आज राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही 171 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यासाठी महाविकास आघाडीने काही नावांची शिफारस देखील केली आहे मात्र राज्यपालांकडून पुढील कारवाई झाली नसल्याने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे राज्यपाल हे भाजपच्या गोटातून असल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेणार याबद्दल शंका नाही. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- देशात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला असताना मराठी कलाकार गप्प का ?
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

