Share

दुसऱ्या कसोटीत न्युझीलंडचा इंग्लंडवर 8 गडी राखुन विजय; मालिकाही 1-0 ने खिशात

Published On: 

मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

न्युझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने 303 धावांची मजल मारली. या डावात सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॅनियन लॉरेन्सने प्रत्येकी 81 धावांची सर्वाधीक खेळी साकारली. न्युझीलंडकडुन या डावात ट्रेन्ट बोल्टने शानदार पुनरागमन करत सर्वाधिक 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात 388 धावांची मजल मारत 85 धावांची निर्णायक आघाडी घेतली. न्युझीलंड कडुन विल यंगने सर्वाधिक 82 धावांची खेळी साकारली. त्याला सलामीवीर डेवॉन कॉनवे (80) आणि रॉस टेलर यांनी चांगली साथ दिली.

इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना होती. मात्र न्युझीलंडच्या गोलंदाजानी पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवत संपुर्ण संघाला 122 धावांवर माघारी तंबुत धाडले. दुसऱ्या डावात इंग्लंडकडुन मार्क वुडने सर्वाधीक 29 धावांची खेली केली तर न्युझीलंडकडुन मॅट हेन्री आणि वॅग्नार यांनी 3-3 गडी बाद केले. दुसऱ्या डावात न्युझीलंडसमोर 41 धावांचे माफक अव्हान ठेवले. न्युझीलंडच्या संघाने 2 गडी गमावत हे माफक अव्हान पार केले. यासह दोन कसोटी सामन्याची मालिका न्युझीलंडने 1-0 अशी खिशात घातली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!