मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाजपने देखील आंदोलनाची हाक दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानो प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल,’ अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
१६ जून रोजी खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत विचारले असता, अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ‘मराठा आरक्षण व्हावे अशी सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळे मोर्चा नेमका कोणाच्या विरोधात आहे?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता सर्व अधिकार केंद्राचे आहेत. आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो,’ असे चव्हाण म्हणाले. या प्रतिक्रियेमुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडीने पंतप्रधानांच्या कोर्टात टोलवल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान आता आता 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाल्यानंतर त्याच धर्तीवर सोलापुरात देखील दुसरा क्रांती मोर्चा काढण्याचे निश्चित झाले आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 16 जून रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मोर्चा निघणार आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरातदेखील त्याच धर्तीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंच्या वाढदिवशी मुंबईकरांना मनसे देणार मोफत कोविशिल्डचे डोस
- ‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत
- वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही; संजय राऊतांचा पुन्हा चंद्रकांतदादांना टोला
- राज ठाकरेंच्या वाढदिवशी मुंबईकरांना मनसे देणार मोफत कोविशिल्डचे डोस
- मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढा; राऊतांच संभाजीराजेंना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

