नाशिक : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे. किशोर यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांना असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. ‘कुणी कितीही रणनिती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि २०२४ लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी काल केला होता. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले, ‘आम्ही कुठं म्हणतोय नाही येणार म्हणून. भाजप पक्षाचे ते नेते आहेत. आजही ते एक मोठे नेते आहेत. त्यांचा चेहरा मोठा आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काही ताकद निर्माण केली तरच बरोबरीची लढत होऊ शकते.’ तसंच पश्चिम बंगालमधील पराभव केवळ भाजपचा नसून तो पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा आहे असं मीडिया म्हणते. तमिळनाडू, केरळमध्ये त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. राजकारण चंचल असतं. इंदिरा गांधींना, जवाहरलाल नेहरुंना , अटल बिहारी वाजपेयींना राजकारण हातात ठेवता आलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
मनावर दगड ठेवून सरकारने निर्णय घेतला
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना राऊत यांनी अजित पवारांनी वारीबाबत घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले. ‘सरकारने लोकांच्या आरोग्याचा विचार करुन निर्णय घेतलाय. लोकांच्या भावना जशा तीव्र आहेत, तसाच कोरोना विषाणू तीव्र आहे. लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. मनावर दगड ठेवून सरकारने निर्णय घेतला आहे. काही लोकांना राजकीय पक्ष फुस लावत आहेत. वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसरी लाट येण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी असं करावं, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यायचे, मतं मागायची, असे यापुढे होणार नाही’, धनंजय मुंडेंनी पंकजांना सुनावले
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक


