🕒 1 min read
मुंबई : दक्षिण अफ्रिकेचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिज संघाचा एक डाव आणि आणि 63 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण अफ्रिका संघाने दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकुन पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण अफ्रिकेने चुकीचा ठरवला. दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ अवघ्या 97 धावांत आटोपला. माजी कर्णधार जेसन होल्डरने वेस्ट इंडिजकडुन सर्वाधीक 20 धावांची खेळी साकारली. 5 फलंदाज वगळता इंडिजचे इतर फलंदाज हे दुहेरी धावसंख्या ओलांडु शकले नाही. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 322 धावा केल्या. क्विटंन डिकॉकने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक 141 धावांची शतकी खेळी साकारली. एडिन मार्करमने 60 धावांची अर्धशतकी खेळी करत त्याला साथ दिली.
225 धावांच्या पिछाडीसह वेस्ट इंडिज दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने 82 धावावर 4 गडी गमावले होते. तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजकडुन 80 धावांची भर घालुन 162 धावांवर उर्वरीत संघ माघारी तंबुत परतला. यासह दक्षिण अफ्रिकेने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 63 धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडुन रॉस्टॉन चेजने सर्वाधिक 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कासीगो रबाडाने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक 5 गडी बाद केले. शतकी खेळीसाठी दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विटंन डिकॉकला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही कुठं म्हणतोय मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत!’, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ
- ‘गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यायचे, मतं मागायची, असे यापुढे होणार नाही’, धनंजय मुंडेंनी पंकजांना सुनावले
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
