Share

‘त्या’ उड्डाणपुलाला ख्वाजा गरीब नवाज नाव देण्याची शिवसेनेची मागणी; तर भाजपचा विरोध

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही साथ घेऊन राज्यात सरकार स्थापन केल्यापासून भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. आता आणखी एका नामकरणावरून भाजपने शिवसेनेला विरोध केलाय.

मुंबईच्या घाटकोपर-मानखुर्द येथील लिंक रोडवरील नव्या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद सुरू झाला आहे. मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब नाव द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. याला भाजपने विरोध केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या उड्डाणपुलाचे नामकरण अण्णाभाऊ साठे असे करावे, अशी मागणी करतानाच शिवसेनेनं आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज ही सोडला असल्याची टीका केली आहे.

‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज ही सोडला. अण्णाभाऊ साठे म्हणजे सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाण पूलास त्यांच नाव देण योग्य असताना ख्वाजा गरीब नवाजचे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना,’ असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!