🕒 1 min read
मुंबई : येत्या १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात. परंतु मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.
राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. यासाठी होणारा सर्व खर्च मनसे करत आहे.
मनसेच्यावतीने सोमवार १४ जून रोजी १८ ते ४४ या वयोगटातील निवडक नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाईल. या लसीकरणासाठी नागरिकांनी शिवडी विधानसभा मनसे गडावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच सोमवारी १४ जून रोजी वाडिया हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. वाडिया हॉस्पिटलमध्ये सोमवारी लसीकरण केंद्राचे उद्घाटन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे, असेही पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोल मॉडेल बनण्याच्या नादात सरपंचांच्या घशातच अडकली स्वॅब स्टिक
- ‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत
- वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही; संजय राऊतांचा पुन्हा चंद्रकांतदादांना टोला
- धक्कादायक! युरो २०२० स्पर्धेदरम्यान अचानक कोसळला ‘ख्रिस्टीयन एरिक्सन’
- PNB ग्राहकांना ‘या’ नंबर द्वारे मिळू शकते अकाउंट बॅलन्सची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
