मुंबई: राज्य सरकारने आज अनलॉकची नवी नियमावली सादर केली. यावेळी लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट मागे घेण्याची मागणी होत होती. मात्र राज्य सरकारने ही सक्ती मागे घेण्यास कोर्टात नकार दिला आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी पूर्वीप्रमाणेच लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असणार आहे.
लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जगातील सर्वच देशांनी लसीकरणावर मोठा भर दिला होता. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भारत थोपवू शकला आहे. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त वाढला नाही. मात्र दुसऱ्या लाटेत भारतात खूप नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासन लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठीच्या लसीकरणाबाबतही राज्य सरकार सक्तीची भूमिका घेताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“गाडी उपलब्ध नसल्यास पायी निघून जा”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तासाभरात दुसरा सल्ला
-
उर्जामंत्र्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार करावा, खर्च आम्ही करू – अशोक सोनोने
-
राज्यातील १४ जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल होणार; नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली
-
भारतीय दूतावासाची काहीही मदत नाही; युक्रेनवरून भारतात परतलेल्या विद्यार्थिनीने व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
