Share

“गाडी उपलब्ध नसल्यास पायी निघून जा”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तासाभरात दुसरा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले वाढत आहेत. युक्रेनमध्ये जोरदार गोळीबार होत असताना, भारताने सर्व भारतीयांना या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खारकीव येथून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले आहे. युक्रेनमधील भारताने ट्विट केले आहे की, “खार्कीव्हमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना महत्त्वाचा सल्ला… तुमच्या सुरक्षेसाठी खार्कीव्ह मधून तात्काळ निघून जा. जेवढ्या लवकर होत असले. तेवढ्या लवकर पेसोचिन, बाबाये आणि बेजलियुडोवकाकडे जा”

दुसर्‍या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असेही म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांकडे वाहने नाहीत आणि जे रेल्वे स्टेशनवर आहेत त्यांनी पेसोचिन (11 किमी),  बाबाये (12 किमी) आणि बेजलियुडोवका (16 किमी) च्या दिशेने पायी जावे. याचे त्वरित पालन करा आणि कोणत्याही परिस्थितीत, युक्रेनच्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येथे पोहोचा. सार्वजनिक वाहतुकीबाबत वाढत्या अडचणींदरम्यान हा सल्ला समोर आला आहे.

खार्कीव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात काल नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. युक्रेनमधील खार्किव रेल्वे स्थानकावर उपस्थित भारतीय विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की त्यांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले आहे. ट्रेन आली आणि गेली पण त्यांना ट्रेनमध्ये चढू दिलं जात नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

खार्कीव्ह रेल्वे स्थानकावर बर्फवृष्टी दरम्यान उघड्यावर उभ्या असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, “येथे थंडी आणि बर्फवृष्टी होत आहे. किती वेळ असे उभे राहायचे माहीत नाही. आमच्या सोबत मुली पण आहेत. त्यांना लवकरात लवकर मदत करावी”, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!