Share

आकाश चोपडाने निवडला टी२० विश्वकपसाठी संभाव्य भारतीय संघ

Published On: 

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने आगामी टी२० विश्वकपसाठी संभाव्य भारतीय संघाची निवड केली आहे. त्याने आपल्या या संघात बरेच आश्चर्य चकित करणारे निर्णय घेतले आहेत. त्याने सांगितलेकी कोणकोणत्या खेळाडूंना टी२० विश्वचषकात संधी दिली पाहिजे.

आकाश चोपडाने पहिले तीन फलंदाज म्हणून रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीला संधी दिली आहे. त्यानंतर चार आणि पाच नंबरला सुर्यकुमार यादव आणि रिषभ पंतला ठेवले आहे. रिषभला त्याने विकेटकीपर म्हणून संघात स्थान दिले आहे. त्यामुळे ईशान किशनला त्याच्या संघात स्थान मिळाले नाही.

फिरकी अष्टपैलू म्हणून त्याने रवींद्र जडेजाला निवडले आहे. त्यामुळे वाशिंग्टन सुंदरला त्याच्या संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर दुसरा अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या आणि वेंकटेश अय्यरला संघात ठेवले आहे. त्यानंतर जलदगती गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मोहम्मद सिराज या तिघांपैकी एकाला संधी द्यावी असे ते म्हणाले.

पुढे ते असेही म्हणाले की, नटराजन व खालील अहमद या दोघांपैकी एकाला संधी द्यावी. त्याने फिरकीपटू रविचंद्रन अश्विन,रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांना आपल्या संघात स्थान दिले नाही. तर त्याने आपल्या संघात कायम ठेवले आहे.

आकाश चोपडाचा टी२० विश्वकपसाठी संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार,/दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा,/ आवेश खान,/ मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, टी नटराजन, खालील अहमद

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!