मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
गर्दी कमी होत नसल्याने राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
????????
Some new additions to the guidelines. Please do read and share.#BreakTheChain pic.twitter.com/OUJt8MXOpp— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2021
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा आणि किराणामाल खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून हा निर्णय आज घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनसाठी ३ कोटी, तुळजापुरात हवेवर प्लँट, उस्मानाबादच्या पालकमंत्र्यांची घोषणा
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

