उस्मानाबाद: उस्मानाबादला कोरोनाचा वाढलेला प्रकोप, अपुऱ्या सुविधा आणि पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून होत असलेले दुर्लक्ष, यामुळे जिल्ह्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात असतानाच कोरेानातून रविवारी सायंकाळी बाहेर पडलेले पालकमंत्री शंकरराव गडाख सोमवारी जिल्हा दौऱ्यावर आले. या दौऱ्यात पालकमंत्रीनी काही मोठे निर्णय घेतल्याने, जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
गंभीर समस्या असलेल्या ऑक्सिजनसाठी त्यांनी वेगवेगळ्या योजनेतून सुमारे ३ कोटी रुपयांची तरतूद केली असून,आता तुळजापूर, उमरगा, कळंब व उमरगा उपजिल्हा रूग्णालयात हवेवर ऑक्सिजन तयार करण्याचे प्लँट उभारले जातील तर कॉन्स्ट्रेटर खरेदीसाठी १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम जिल्हा नियोजन समिती, एसडीआरएफ किंवा गौण खनिज,यापैकी कोणत्याही फंडातून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यांच्या दौऱ्याने आरोग्य व्यवस्थेतही ऊर्जा आली आहे.
पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीनंतर जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. जिल्ह्यात कोरेानाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, तुलनेने आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही त्यांना टार्गेट केले होते. मात्र पालकमंत्री गडाख स्वत.: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना दवाखान्यात भरती व्हावे लागले. रविवारी त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर सोमवारी ते जिल्ह्यात आले. सकाळी तामलवाडी येथील ऑक्सिजन स्टोरेज सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

