नवी दिल्ली : भारतीय इंधन तेल कंपन्यांनी आज शनिवारी (दि. २० नोव्हेंबर) जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलबाबत (Fuel Price) लोकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.
इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारीही घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असूनही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष कपात झालेली नाही.
भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 109.98 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 94.14 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर नागरिकांना मोजावे लागणार आहे.
दरम्यान, दिवाळीच्या अगोदर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ आणि १० रुपयांनी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता भाजपनेही राज्य सरकारने इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणताही दिलासा दिला नाही.
महत्वाच्या बातम्या:
- ‘बैल कितना भी अड़ियल क्यों न हो, पर..’, राऊतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला
- रायगडात महागाईविरोधात कॉंग्रेसचे जनजागरण अभियान; मंत्री वडेट्टीवारांची उपस्थिती
- ‘आयपीएल नसती तर कदाचित हर्षल पटेलला भारतीय संघात स्थान मिळाले नसते’
- ‘मानिके मागे हिते’ गाण्याचा अमृता फडणवीसांनी केलं रिमेक गाणं, पाहा व्हिडीओ
- ‘असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय’; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र


