मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंचे उजवे हात असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे. यावेळी माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे.
दरम्यान एकूण ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महेंद्र थोरवे ,भरत गोगावले, महेंद्र दळवी,
अनिल बाबर, महेश शिंदे ,शहाजी पाटील ,शंभूराज देसाई ,बालाजी कल्याणकर , ज्ञानराजे चौघुले , रमेश बोरणारे , तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख ,प्रकाश सुर्वे,किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल ,संजय रायुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे ,विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर अशी या आमदारांची नावे आहेत.
आज पहाटे सूरतहून एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. दरम्यान आज एकनाथ शिंदे मुंबईला येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज भाजपसोबत सत्तास्थापनेचा दावा एकनाथ शिंदे करतील का, अशा चर्चा होत आहेत. ठाकरे सरकारला जबर धक्का दिल्याचे आता राजकारणात म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde & Bacchu Kadu Update – एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर
- Anil Parab : शिवसेनेला दुसरा दणका? अनिल परब ९ तासांपासून ईडी ऑफिसमध्ये; अटकेची टांगती तलवार
- BJP vs Shiv sena : महाराष्ट्र भाजपकडून नव्हे तर केंद्रातून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न!
- Eknath Shinde Update : “तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो”, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद
- Kishori Pednekar : “बाळासाहेबांच्या प्रतिमेजवळचा लाईट हालतोय, त्यांना…” ; किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

