मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत खळबळ उडाली आहे. सकाळी उद्धव ठाकरेंचे उजवे हात असलेले एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर गेले होते. मात्र या भेटीला यश आले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आणि भाजपासोबत या, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवला.
एकनाथ शिंदे जवळपास 30 पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरतमधील मेरेडीयन हॉटेलमध्ये आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे रात्रीच सुरतला रवाना झाले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी अट उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली आहे. त्यांची नाराजी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत आहे.
दरम्यान यावर किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली. पेडणेकर म्हणतात आज बाळासाहेबांच्या प्रतिमेजवळचा लाईट हालतोय. त्यांना त्रास होतोय. कायम स्टेबल असणारा लाइट आज हालतोय त्यांना आज खूप त्रास होत असेल, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

