Share

स्वतःची ओळख बनवायला घरातून पळालेल्या मुलाला आनंद महिंद्रा यांनी दिली इंटर्नशिपची ऑफर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  घरची गडगंज संपत्ती असूनही तो स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तो घरातून पळून गेला. मात्र त्याच्या नशिबात काहीतरी अद्द्भूतच असल्याचा अनुभव त्याला आला. घरातून पळालेल्या त्या गर्भश्रीमंत मुलाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी इंटर्नशीपची ऑफर दिली. त्याच नाव द्वारकेश ठक्कर.

शिमलामधील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करून तो रात्री एका दगडावर झोपायचा. द्वारकेशसंदर्भातील एका वेबसाइटवरील बातमी शेअर करत आनंद महिंद्रांनी त्याला इंटर्नशीप देऊ केली आहे. “या मुलाचं मी कौतुक करतो. तो मेहनत करुन पुढे जाऊ इच्छितो. त्या विचारातून आता जरी त्याने घर सोडलं असलं तरी तो भविष्यात एक यशस्वी व आत्मनिर्भर उद्योगपती होऊ शकतो. मी माझ्या महिंद्रा राइज कंपनीत त्याला इंटर्नशीप देऊ इच्छितो”, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं. तर ”माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. महिंद्रा राइज कंपनीच्या एखाद्या व्यक्तीशी माझा संपर्क होऊ शकला तर मी नक्कीच या ऑफरचा विचार करेन. ” अशी प्रतिक्रिया द्वार केशने दिली आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रांचं हे ट्विट वाचून द्वारकेशच्या वडिलांनीही आनंद व्यक्त केला. “माझ्या मुलाला स्वत:च्या मेहनतीने पुढे जायचंय. हेच त्याचं एकमेव स्वप्न आहे”, असं ते म्हणाले. १४ ऑक्टोबर रोजी त्याने कॉलेजला जातो म्हणून घर सोडलं होत. पोलिसात ताक्रात दिल्यावर तपास नंतर तो शिमल्यातील हॉटेलमध्ये काम करत असल्याचे आढळून आले होते. घर सोडताना त्याच्या खिशात १२५० रुपये होते. त्यापैकी १०७० रुपये तिकिट व २० रुपये पाण्याच्या बाटलीवर खर्च झाले. गेल्या आठवड्यात जेव्हा राकेश हे द्वारकेशला भेटले, तेव्हा त्याने शिल्लक राहिलेले १६० रुपये वडिलांना परत दिले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1194904799868669952?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194905152777441281?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!