Share

… आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बोलता बोलता पाण्यात पडला; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या १२ मार्चपासून सुरू होणार्‍या दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी कराचीत दाखल झाला आहे. संघ कराचीतील त्यांच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स कॅरी सोबत एक मजेशीर घटना घडली ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

झाले असे कि, ऑस्ट्रेलिया संघ कराचीत हॉटेलमध्ये पोहचला. तिथे कॅरी (alex carry) नॅथन लियॉनशी (nathan lyon) बोलत बोलत चालला होता. याचवेळी तो चुकून स्विमिंग पूलमध्ये पडला. घटनास्थळी उपस्थित ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या हशावर नियंत्रण ठेवता आले नाही कारण कॅरी देखील याबद्दल हसत असल्याचे दिसले. हा क्षण ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (pat cummins) टिपला, त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला.

https://www.instagram.com/p/Ca6ax6StLZg/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान २४ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा दौरा करत आहे. ज्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यांवरून अनेक मोठे वाद सुरु झाले आहेत. आयसीसीने सामना खेळल्या गेलेल्या रावळपिंडीच्या पीचला कमी रेट केले आहे. दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून कराची येथे सुरु होईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!