🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मागील काही वर्षांपासून संघाचा प्रमुख आधारस्तंभ बनलेला आपण पहिले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठे शिखर गाठले आहे. तो एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून खूप पुढे गेला आहे. शुक्रवारी मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध तो कारकिर्दीतील ऐतिहासिक सामना खेळणार आहे. त्याचा हा १०० वा सामना असणार आहे.
शुक्रवारी मैदानात उतरताच त्याचा त्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश होणार आहे. ज्यांनी भारतासाठी १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. १०० कसोटी खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत विराट १२ वा खेळाडू ठरेल. तर जगात ७२ वा.
बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात विराट कोहली म्हणाला आहे की, कधी ही विचार केला नव्हता की १०० कसोटी सामने खेळेल. या दरम्यान खूप क्रिकेट खेळले आहे. खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. आभार मानतो की, १०० सामने खेळण्यास सक्षम राहिलो. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. हा क्षण माझ्या परिवारासाठी व प्रशिक्षकांसाठी खूप आनंदाचा आहे.
पुढे तो म्हणाला, माझ्या मनात कायम हाच विचार असयाचा की मी मोठी धावसंख्या करावी. मी जुनियर क्रिकेटमध्ये डबल शतक ठोकले आहेत. शेवटी तो म्हणाला कसोटी क्रिकेट जिवंत राहिले पाहिजे. हेच माझ्यासाठी खरे क्रिकेट आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
