Share

Akshay Kumar | अक्षय कुमारच्या छत्रपतींच्या भूमिकेला नेटकऱ्यांचा विरोध, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Akshay Kumar | मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दररोज काही ना काही चित्रपटाशी संबंधित अपडेट येत आहे. अशात अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावरून दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ (Vedat Veer Daudle Saat) या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. या चित्रपटामध्ये बॉलीवुड खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये अक्षय छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमध्ये दिसत आहे.

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करताना दिसत आहे. अक्षयच्या या भूमिकेसाठी फक्त प्रेक्षकच नव्हे, तर कलाकार देखील खूप उत्सुक आहेत. अक्षयने शेअर केलेल्या फोटोनंतर अजय देवगन, शरद केळकर आदी कलाकारांनी अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर शेअर केलेल्या या शॉर्ट व्हिडिओनंतर नेटकरी अक्षय कुमारला प्रचंड ट्रोल करत आहे. कारण नेटकरऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला शोभून दिसत नाही.

अक्षय कुमारने शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याच्या डोक्यावरती बल्बचा झुंबर बघायला मिळत आहे. आणि त्या झुंबरावरून अक्षय आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. त्याचबरोबर अक्षयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

यामध्ये एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”महेश मांजरेकर यांनी लावलेले ‘दिवे’ पाहता मुघलांनी छत्रपतींवर फायटर विमानाद्वारे आक्रमण केलं होत असं दाखवणार नाही, म्हणजे मिळवलं.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”अक्षय कुमार या भूमिकेसाठी अजिबात शोभून दिसत नाही.” अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया अक्षयच्या या पोस्टवर बघायला मिळत आहे. ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!