🕒 1 min read
Aryan Khan | मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) चित्रपटसृष्टीपासून जरी लांब असला, तरी तो सतत चर्चेत असतो. त्याचबरोबर चाहते आर्यन खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण आर्यनला पडद्यावर नाही तर पडद्यामागे काम करण्यात इंटरेस्ट आहेत. होय! आर्यनला कॅमेरासमोर नाही, तर कॅमेरा मागे काम करण्यात इंटरेस्ट आहे. आर्यन खानने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. आर्यनच्या या पोस्टनंतर असे दिसून आले आहे की, त्याचे फिल्मी करिअर लवकर सुरू होणार आहे.
बॉलीवूड करिअरबाबत आर्यन खान (Aryan Khan) ने केली मोठी घोषणा
आर्यन खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या बॉलिवूड पदार्पणाची घोषणा केली आहे. त्याने यामध्ये हे देखील स्पष्ट केले आहे, की तो पडल्यावर नाही तर पडद्यामागे काम करणार आहेत. कारण आर्यनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एका चित्रपटाची स्क्रिप दिसत आहे. त्याचबरोबर या स्क्रिप्ट वर आर्यनचं नाव देखील लिहिलेलं आहे.
Aryan Khan | बॉलीवूड करिअरबाबत आर्यन खानने केली मोठी घोषणा, म्हणाला…https://t.co/QvYOGkCfWf
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 7, 2022
आर्यनने ही पोस्ट इंस्टाग्राम वर शेअर करत असताना त्याला कॅप्शन दिले आहे की,”लिखाण पूर्ण झाले आहे, आता शूटिंगसाठी प्रतीक्षा करू शकत नाही.” आर्यनने शेअर केलेल्या पोस्टचा अर्थ असा होतो की, त्याने चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे आणि स्क्रिप्ट आता पूर्णपणे तयार झालेली आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या फोटोमध्ये शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’चे नाव देखील दिसत आहे. यावरून असे लक्षात येत आहे की आर्यनचा हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणार आहे.
आर्यन खान गेले अनेक दिवस एका सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. त्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झालेले असून आता लवकरच आर्यनला ॲक्शन म्हणण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आर्यन गेले अनेक दिवस करत असलेल्या मेहनतीचे फळ त्याला आता मिळणार आहे. आर्यन खान सोबतच त्याचे पालक शाहरुख खान आणि गौरी खान यांचा देखील या पोस्टनंतर आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Strep A Infection | UK मध्ये 6 मुलांचा बळी घेणारे स्ट्रेप ए इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या
- 7 Seater Car | 7 सीटर कार घ्यायचा विचार करत असाल?, तर ‘हे’ मॉडेल्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन
- Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेनं लेकाचं फोटो पोस्ट करत शेअर केलं नाव
- Tarak Mehta Ka Ulta Chashma | तारक मेहतानंतर ‘टप्पू’ने केलं तारक मेहता का उलटा चष्माला रामराम
- Fennel Health Benefits | रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
