Share

Sanjay Raut | “दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”; संजय राऊतांचे गंभीर आरोप

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

 

“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ!”, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे.

“मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, तीन महिन्यांपूर्वी आम्ही क्रांती केली. आता क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा-पेचा कधीच झाला नव्हता. यांनी तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले आहे. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली, असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे”, असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

दरम्यान, “हे डरपोक लोक आहेत. मंत्र्यांचे काय घेऊन बसला आहात. कर्नाटकातून यांना खलिता आला येऊ नका. यांची हातभर फाटली. यांनी जायला पाहीजे होतं. मंत्र्यांनी धाडसाने जायला पाहीजे होतं. कसला कायदा-बियदा सांगत आहात. आमच्या गाड्या फोडल्या ते कायद्यात बसते का?, बेळगाव-कारवार हा महाराष्ट्राचा भाग आहे. आमच्या बापाचा आहे,” असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!