Share

‘चंगु मंगु’ म्हणत उद्धव ठाकरे यांच्या वरील टिकेनंतर नेटकऱ्यांकडून कंगना झाली ट्रोल

Published On: 

मुंबई : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत हिने आता आणखी एक ट्विट करत रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात राज्यातील परिस्थिती हाताळण्यावरून निशाणा साधला होता.

‘जो व्यक्ती आधी स्वत: दहशत पसरवत होता आता तोच कोरोनाच्या दहशतीखाली जगतोय.’ अशी जोरदार टीका तिनं केली आहे. ‘हे शहर आता जणू एखाद्या सांगाड्यासारखं भासतंय. कधीकाळी जे इतरांना स्वत:च्या दहशतीनं घाबरवत होते. आज ते स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ही स्थिती पाहून मला आश्चर्य वाटतंय. जय मुंबा देवी.’ अशा आशयाचं ट्विट करुन तिनं मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला होता.

त्याच बरोबर केवळ एक राजाच चांगलं शासन करू शकतो , चंगु मंगु नाही जो आपल्या प्रजे सोबत इर्षा किंवा बदल्याची भावना ठेवतात, असा माणूस कधी राजकीय मूल्य समजू शकतो का ? प्रशासनाकडून एकट्या स्त्रीचा अपमान करणारा, समाजात मजाक बनवणारा राजा होऊ शकतो का ? असा सवाल करत तीने यावेळी टीका केली होती.

https://twitter.com/marigold3007/status/1381747018440183808?s=20

मात्र यावरून आता नेटकऱ्यांनी कांगनाला चांगलेच ट्रोल केले आहे. या ट्विटनंतर चंगू मंगू गँग नरेंद्र मोदी व अमित शाहसाठी तर लिहिले नाहीस ना? असा खोचक प्रश्न अनेक युजर्सनी तिला विचारला. महाराष्ट्राचे माहित नाही, पण कंगनाचा मेंदू पूर्ण लॉकडाऊन झाला आहे, अशी कमेंट करत एका युजरने तिला ट्रोल केले. त्यामुळे कांगणाच्या अनेक ट्विट प्रमाणे हे ट्विट देखील तिच्यावरच ट्रोल झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!