Share

देवेंद्रजींबद्दल आता काय बोलणार…, मी पुन्हा येणार म्हणता-म्हणता ते आलेच नाहीत – बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली असून सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन भिन्न विचारांचं सरकार असून फार काळ टिकणार नाही असं भाकीत अनेकदा भाजप नेत्यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी एका दिवसात ते तब्बल ६ प्रचारसभा घेतल्या.

‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. आता फडणवीसांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला आहे. ‘आता देवेंद्रजींबद्दल काय बोलणार, मी पुन्हा येणार म्हणता-म्हणता ते आले नाही आणि अजूनही ते तशीच घोषणा करत आहेत. आपल्या आमदारांचे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा हा प्रकार आहे. असा घणाघात थोरात यांनी केला आहे. मात्र, आघाडी सरकार चालणार आणि पाच वर्ष आम्ही काम करणार. असा विश्वास देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!