Share

दुसऱ्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आनंदाची बातमी

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाचा कोहलीच्या आरसीबीच्या संघाने पराभव केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीने हे लक्ष्य ८ गड्याच्या मोबदल्यात पार केले. मात्र दुसऱ्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघात एका महत्वाच्या खेळाडूचे पुनरागमन झाले आहे.

मुंबई इंडियन्सचा नियमीत सलामिवीर क्विंटन डिकॉक आपला क्वारंटाईन कालावधी संपवून संघासाठी उपलब्ध झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पाकिस्तानबरोबर सुरु मालिकेत डीकॉक खेळत होता. त्यानंतर कोरोना नियमानुसार डीकॉक क्वारंटाइन झाला होता आणि त्यामुळे सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सलामीवीर म्हणून ख्रिस लीनला संधी देण्यात आली होती.

सलामीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर धावचीत झाला होता. रोहित बाद झाल्यानंतर ख्रिस लीन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी करत संघाला सावरले होते. लीनने चांगली फलंदाजी केली असल्यामुळे मुंबईच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण लीनने चांगली फलंदाजी केली असल्याने त्याला वगळण्याचा धोका मुंबई पत्कारेल का. तर एकीकडे संघात केवळ चारच विदेशी खेळाडूंची मर्यादा असल्याने डिकॉक आणि लिन दोघांना खेळवले तर मार्कोला संघाबाहेर जावे लागेल. त्यामुळे गोलंदाजीचा एक पर्याय कमी होईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!