उस्मानाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, त्याचबरोबर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्राची संख्याही आता ९३ वरून १५३ पर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार ग्रामीण भागातील ६० उपकेंद्रावर गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून मंगळवारपासून कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन केल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ १५० होती ती आता ४१८८ पर्यंत वाढली आहे. महिनाभरात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४०३३ ने वाढली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ६३१ जणांचा बळी गेला आहे. तर महिनाभरात तब्बल ५० लोकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.डी.के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोना लसीकरणसाठी ९३ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात जिल्हा रुग्णालय २, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १, उपजिल्हा रुग्णालय ४, प्राथमिक आरोग्य केंद्र ४३ व २८ उपकेंद्र असे शासकीय ८५ तर खाजगी रुग्णालयातील ८ केंद्राचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकताना डॉक्टरला केली पोलिसांनी अटक
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

