Share

ना पालखी ना सोहळा; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राम जन्मोत्सव होणार घरातच

Published On: 

बीड: राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत त्यामुळे राज्यात कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी मंदिरे देखील बंद ठेवण्यात आले आहेत. बुधवारी रामनवमी उत्सव म्हणजेच राम जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा उत्सव घरात साधेपणानेच करण्यात येणार आहे.

साडेपाचशे वर्षांची परंपरा असलेल्या तालुक्यातील युसूफवडगावातील जन्मोत्सव सोहळा अगदी साधेपणाने होणार आहे. मंदिरे बंद असल्याने गावातील सप्ताह, पालखी मिरवणूक, बैलगाड्या ओढल्या जाणार नसल्याने या वर्षीही खंड पडला आहे. बुधवारी दुपारी ग्रामस्थ घरोघरी प्रभू रामजन्मोत्सवाच्या वेळी गुलाल व फुले उधळून साधेपणाने उत्सव साजरा करणार आहेत.

युसूफवडगावात असलेल्या पुरातन मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आणि मारुती या देवतांच्या पंचधातूंच्या मूर्ती असल्याने या मंदिराला रामपंचायतन म्हणून ओळखले जाते. गावातून रामचंद्रांची पालखीतून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ही मिरवणूक गावातील मंदिराजवळ आल्यावर दुपारी दोन वाजता रामभक्त गणपतराव घायाळ १२ बैलगाड्या ओढत असतात. ही परंपरा येथील ग्रामस्थांनी मागील ५५० वर्षांपासून गावात रुजवली. मात्र, मागील वर्षीही प्रमाणेच कोरोनाच्या संकटामुळे यंदाही मंदिर बंद राहणार असून येथे भरणारी यात्रा, उत्सव व इतर कार्यक्रम होणार नाहीत.

युसूफवडगावचा रामजन्म सोहळ्यात होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम, छबिना पालखी मिरवणूक, १२ बैलगाड्या ओढणे असे धार्मिक कार्यक्रम कोरोनामुळे बंद असणार आहेत. बुधवारी रामजन्मोसव घरीच साध्या पद्धतीने होणार आहे. हा राम जन्मसोहळा सोशल मीडियावरून लाइव्ह केला जाणार असल्याची माहिती श्रीधर सीताराम बुवा रामदासी यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!