Share

देशाची अर्थव्यवस्था रुळावर; जीएसटी संकलनात ७ टक्क्यांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात सलग पाचव्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात १.१३ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर देशातील आर्थिक घडामोंडींना वेग मिळालाय.

वार्षीक आधारावर विचार केल्यास जीएसटी संकलनामध्ये ७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये जीएसटी संकलन १.०५ लाख कोटी रुपये झाले होते, जे फेब्रुवारी २०२१ मध्ये वाढून १.१३ लाख कोटी रुपये झाले आहे. विशेष म्हणजे आयात होणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी संकलनातही १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जीएसटी प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्याने ही वाढ नोंदवण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

असे झाले संकलन : फेब्रुवारी २०२१ मध्ये केंद्रीय जीएसटीमध्ये २१ हजार ९२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. तर राज्य जीएसटीमध्ये २७ हजार २७३ कोटी रुपये संकलीत झाले आहेत. इंटीग्रेटेड जीएसटी संकलन ५५ हजार २५३ कोटी रुपयांचे झाले आहे. यातील २४ हजार ३८२ कोटी रुपयांची रक्कम आयात होणाऱ्या वस्तूंवरील वसूली आहे. या व्यतिरीक्त सेसच्या माध्यमातमून ९ हजार ५२५ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!