🕒 1 min read
मुंबई:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरलाय. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची भाजप पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून मतदार नोंदणीकडे झालेले दुर्लक्ष भाजपला भोवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर पुढील निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढविणार, हे गृहीत धरूनच आता भाजपची रणनीती आखणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले.
मतदार नोंदणीसाठी मार्च ते जुलैपर्यंतचा कालावधी होता. कोरोनामुळे भाजप कार्यकर्ते मदतकार्यात होते, पण घरोघरी जाऊन मतदार नोंदणीत कमी पडले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून साधारणपणे ८० हजार ते लाखभर नवीन मतदारांची नोंदणी होते. विधान परिषद निवडणुकीआधी केवळ २० हजारांच्या आसपास ती झाली. मात्र या निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यात भाजपचे मतदार कमी असल्याने फटका बसला. मराठवाडय़ातही भाजपकडून मतदार नोंदणी कमी झाल्याने फटका बसला, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदर पुनावाला ‘एशियन ऑफ दी इयर ’
- केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला
- आम्ही तीन पक्ष एकत्रित लढलो तर भाजपचं डिपॉजिट सुद्धा राहणार नाही- हसन मुश्रीफ
- ‘दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांची वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच’
- ‘हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही’, सैफवर भडके भडकले राम कदम


